शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:00 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून नांदूरवैद्य येथे मागील आठवड्यातच नांदूरवैद्य गावाजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात एक बिबट्याची मादी व दोन बछडे निदर्शनास आल्याची घटना ताजी असतांना या बिबट्याने एका ऊसतोड कामगारावर हल्ला चढवला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.यामुळे नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. सदरचे वृत्त लोकमतमध्ये १ डिसेंबर रोजी प्रकाशित केल्यामुळे अखेर वनविभागाला जाग आली असून या परिसरात पिंजरा लावण्यात आला. एका आठवड्याच्या कालावधीमध्ये बिबट्याने बैलावर हल्ला चढवत ठार केले होते. परिसरात जवळपास एक महिन्यांपासून वास्तव्यात असलेल्या हा बिबट्या अधूनमधून नागरिकांच्या निदर्शनास येत असून भविष्यात एखादी मोठी घटना घडू शकते. नुकताच रोकडे यांच्या एका बैलावर सदर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे यावेळी येथील नागरिकांनी बोलून दाखवले. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे येथील गावातील व शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये मागील एक महिन्यापासून नांदूरवैद्य शिवारातील शेतवस्तीवर बिबट्याचा वावर वाढला असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण कर्पे यांचे एक वासरु घराजवळील पडवीत येऊन ठार केल्याची घटना घडली होती.य् ाामुळे जनावरांवर हल्ला झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. परिसरात बागायती क्षेञ मोठयÞा प्रमाणावर आहे.तसेच या ठिकाणी ऊसाचे क्षेञ वाढले आहे.यामुळे बिबट्याच्या या दहशतीने ग्रामस्थ दिवसासुद्धा घाबरु लागले आहेत.यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावण्यात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक