शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खामखेड्यात मादीला पकडण्यासाठी पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:11 IST

खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदहशत : दोन दिवसांपासून बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्यांत भीती

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्यादोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत होती. वनविभागाने पिंजरा लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच वनविभागाने याची तातडीने दखल घेऊन पिंजरा लावला व गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडायेथील फांगदर शिवारातील यशवंत पवार, दत्तू पवार व दत्तू हिरे यांच्या शेतात सोनू पवार व राकेश बच्छाव हे पिकांना पाणी देत असताना शेजारील टमाट्याच्या शेतात बिबट्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्यांनी आरडाओरड करत शेतकºयांना आवाज दिल्याने शेतकरी जमा झाले. याची माहिती देवळा येथील वनविभागाला देण्यात आल्याने वनरक्षक शांताराम आहेर यांनी शेतात जाऊन पाहणी केली. तेव्हा शेतात बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले.बिबट्याची मादी बछड्यांना घेण्यासाठी येईल असे वाटत होते. परंतु सलग दोन दिवस बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. बछड्यांच्या शोधार्थ मादी केव्हा येईल याची भीती शेतकºयांत असल्याने त्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तेव्हा याची दखल घेऊन वनविभागाने पिंजरा लावला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल