शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडून पंचांग पाहूनच मंत्रिमंडळाचा विस्तार : गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:44 IST

‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’ अशी टिपणी करत राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या दरवेळी होणाऱ्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आणि विस्ताराची चर्चाच असल्याचे स्पष्ट केले.

नाशिक : ‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’ अशी टिपणी करत राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या दरवेळी होणाऱ्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आणि विस्ताराची चर्चाच असल्याचे स्पष्ट केले.  नाशिक जिल्हा दौºयावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधनाचे दर दिवसागणिक वाढत चालले असून, जनतेच्या मनात सरकार विषयी तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे, परंतु सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही, उलट पेट्रोल शंभरी पार करेल अशी सरकारलाच आशा वाटत असल्याने जनतेने येत्या निवडणुकीत मतदान या शस्त्राचा वापर करून जागा दाखवून द्यावी अशा शब्दात पाटील यांनी भाजपा सरकारवर टीका केली. अन्य राज्ये इंधनावरील भार कमी करीत असताना राज्य सरकारनेही हा भार कमी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.  इंधन दरवाढीबाबत शिवसेना विरोधीपक्षात होती तेव्हाही आंदोलन करीत होती व आत्ताही करीत आहे, परंतु त्यावेळी विरोधात असल्याने आंदोलन करणाºया भाजपाने सत्तेवर येताच, इंधन दरवाढीचे आंदोलन विसरली आहे, असा टोला त्यांनी लगावला.  पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहत असून, सरकारने केवळ पेट्रोलचे दरच बदलले नाहीत तर पंपावर लावलेले पोस्टर्सही बदलले आहेत. पूर्वी पोस्टर्सवर एक म्हातारीचे चित्र होते, त्याची जागा आता तरुण मॉडेलने घेतली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोलचे भाव आणखी वाढतील त्याचे हे संकेत असल्याचे भाकित पाटील यांनी केले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीShiv Senaशिवसेना