शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोबी-फ्लॉवरचे कोसळले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:51 IST

शेतकरी चिंतित : उत्पादन खर्च भरुन निघणे अवघड

ठळक मुद्देकोबी व फ्लॉवरचा एक गड्डा पाच रु पयाला विकावा लागत आहे.

खामखेडा : दर कोसळल्यामुळे कोबी व फ्लॉवर कवडीमोल भावाने विक्र ी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असल्याने पिकासाठी केलेला खर्च भरुन निघणेही अवघड होऊन बसले आहे.खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात कोबी या पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे गुजरात मघील अहमदाबाद ,नवापूर, भरु च, सूरत आदि मार्केट मघ्ये कोबीसाठी खामखेडाचे नाव प्रसिद्ध आहे. गुजरात मधील काही व्यापारी कोबी खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. यामुळे गावातील काही स्थानिकांनाही रोजगार मिळतो. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळी कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले. कांद्याच्या रोपा अभावी लागवडीच्या क्षेत्रात घट झाल्याने शेतकऱ्यांचे काही क्षेत्र पडून होते. त्यामुळे शेतक-यांनी या जागेवर कोबी व फ्लॉवर पिकाचे लागवड केली. मध्यंतरी कांद्याला भाव असल्याने पर्याय म्हणून कोबीला मोठी मागणी होती. त्यामुळे पुढेही कोबीला भाव राहील या आशेने शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कोबी पिकांची लागवड केली. सुरवातीला कोबी जागेवर २० ते २५ रूपये विकली जात होती. आता भरपूर कोबी पिक आल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोबी व फ्लॉवरचा एक गड्डा पाच रु पयाला विकावा लागत आहे. एक गड्डा साधारण दोन किलोच्या असतो. मार्केट मघ्ये कोबी व फ्लॉवर विक्र ीसाठी नेले तर वाहन खर्चही निघत नाही. काही शेतकरी किरकोळ बाजारात जाऊन त्याची विक्री करत आहेत.एकरी चाळीस हजार खर्चकोबी पिक घेणे खर्चिक बनले आहे. कोबी पिकाला मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावे लागते. या फवारणीची औषधेही महागडी असतात. एक एकर कोबीसाठी बियाणे, लागवड खर्च, फवारणीचा खर्च यांचा सर्व विचार करता एकरी चाळीस हजार रूपये खर्च येतो. उत्पादन खर्चाचा विचार करता कोबीला निदान दहा ते पंधरा किलो रूपये बाजार भाव शेतक-यांना अपेक्षित आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक