शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:32 IST

विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले.

गिरीश जोशी /मनमाड : विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहर परिसरातून दुख व्यक्त करण्यात येत आहे. एक झुंजार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई व मुलगी अ‍ॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे.नगर जिल्हातील खंडकरी शेतकऱ्यांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतकºयांचे नेते म्हणून बाबूजींना ओळखले जात. आयुष्यात त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या त्या भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या व समाजवादी पक्षाच्या आदेशा नुसार लढविल्या. विधानपरिषदही लढविली .लोकसभेच्या जालना व कोपरगाव मतदारसंघातुन निवडणुका लढवल्यामुळे अनेक बरे वाइट अनुभव त्यांना आले. बाबूजी महाराष्टÑ राज्य पातळीवर काम करीत असल्यामुळे पक्षाकडून त्यांना राज्यात कोठेही निवडणुक लढविण्यास सांगितले जायचे . पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून जाईल तिथे अतिशय जिद्दीने निवडणुका लढण्याची तयारी बाबुजींची असत. १९५७ ते १९६२ च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणुक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. त्या वेळेस दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, एस.एम .जोशी ,साने गुरुजी ,ना.ग,गोरे असे अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर प्रचारक म्हणून होते त्याच बरोबर डॉ .ए.बी. वर्धन ,सुधाकर रेड्डी ,डी.राजा यांच्या सारखे अनेक कम्युनिष्ट नेते त्यांना सहकारी म्हणून मिळाले. नांदगाव तालुक्यातून अनेक निवडणुका लढविल्या परंतु प्रवाहाच्या विरुद्द राजकारणात असल्याने त्यांना अनेक निवडणुकीत निसटता पराभव स्विकारावा लागला .मनमाड शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. १९८४ मधे लोकसभेची निवडणुक जाहीर झाली व भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या आदेशानुसार त्यांना कोपरगाव लोकसभा मतदार संघात निवडणुक लढविण्यास सांगण्यात आले. प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब विखे पाटील हे धनाढ्य उमेदवार तसेच अनेक वर्षापासुन खासदार म्हणुन कार्यरत होते .त्यांना टक्कर देणे बाबूजींसारख्या आर्थिकदृष्या कुमकवत उमदेवाराला मोठे अवघड काम होते.प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिले. संपुर्ण कोपरगाव मतदार संघातील गावे, पाडे, वस्त्या पायाखाली घालून मतदार संघ पालथा घातला. साखर सम्राटांच्या कार्यक्षेत्रात प्रचारादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक तडीस लावली.कोपरगाव मतदारसंघाची निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची निवडणूक ठरल्याने त्या वेळी बीबीसी रेडीओने त्यांच्या उमेदवारीची दखल घेउन वृत्त प्रसिध्द केले होेते.या वृत्तामुळे कॉँग्रेस नेत्यांमधे घबराट निर्माण झाली.त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात कॉँग्रेसचे अनेक बडे नेते कोपरगाव मधे तळ ठोकून जोरदार कामाला लागले होते.या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. १९८५ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाड सह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता.सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून प्रचाराचा रान उठवले व बाबूजींना एकतर्फी मतदान करून विधानसभेत पाठवले. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या. अशा या झुंजार नेतृत्वाला तालुका आज मुकला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक