शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणूक : प्रभाग १३ मध्ये तिरंगी सामना आज प्रचाराची रणधुमाळी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:13 IST

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून, बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे.

ठळक मुद्दे६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहेअखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून, बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. पोटनिवडणुकीत मनसे, सेना आणि भाजपा उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, मतदानाची तयारी प्रशासनामार्फत सुरू असून, मंगळवारी (दि.३) २५० कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले.प्रभाग क्रमांक १३ (क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत मनसेकडून अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपाच्या विजया हरिष लोणारी या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. याशिवाय, राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार यांनीदेखील अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपली तलवार म्यान केली आहे. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रचार पत्रकांचेही वाटप करत मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितली जात आहे. मनसेसह भाजपाने मतदानाच्या दिवशी बूथवर प्रतिनिधींच्या नियुक्त्या केल्या असून मतदान स्लिपांचेही वाटप बुधवारी-गुरुवारी केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी प्रभागात ६१ बूथ उभारले जाणार आहेत.