शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या दोन्ही आमदारांसाठी प्रभागाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:49 IST

प्रभाग क्रमांक १३ : शिवसेना-मनसे उमेदवारात काट्याची टक्कर

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक १३ (क) मधील रिक्त जागेसाठी दि. ६ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहेमनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले निवडणूक रिंगणात

नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना व मनसे उमेदवारामध्ये काट्याची टक्कर दिसून येत असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात सदर जागा पडावी याकरीता शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे.प्रभाग क्रमांक १३ (क) मधील रिक्त जागेसाठी दि. ६ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे, शिवसेना आणि भाजपासह काही अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. मनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले निवडणूक रिंगणात आहेत तर शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांनी मनसेपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मनसे आणि शिवसेना उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे. त्यात, भाजपाच्या उमेदवारी विजया हरिष लोणारी यांनीही रंगत आणली आहे. पोटनिवडणूक लढविणार आणि जिंकणारही, असे सांगणारे भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी भाजपा उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न चालविले होते. त्याबाबत वसंत स्मृती येथे झालेल्या बैठकीत त्याचे पडसादही उमटले होते. माजी नगरसेवक हरिष लोणारी यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवल्याने पक्षनेतृत्वाचा नाईलाज झाला होता. त्यामुळे, विजया लोणारी यांचा अर्ज कायम राहिला. तर लोणारी यांच्यासाठी मध्य विधानसभेच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. आता, सदर जागेवर भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शहराध्यक्ष असलेले आमदार सानप आणि मध्यच्या आमदार फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे. जागा गमावली तर दोन्ही आमदारांना धक्का बसणार आहे तर जागा जिंकल्यास त्याचे श्रेय दोहोंना मिळणार आहे. त्यामुळे, पक्षाने लढतीत जाणीवपूर्वक लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि.२७) पक्ष कार्यालयात त्यासंबंधी बैठक होऊन प्रचाराचे नियोजन करण्यात आले. शिवसेनेमध्ये खांदेपालट झाल्यानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही महानगरप्रमुखांसाठीही सदर लढत प्रतिष्ठेची बनली आहे.प्रचारात रंगतपोटनिवडणुकीसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. आठ दिवसांनी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने उमेदवारांकडून प्रभागाची पायपीट सुरू झाली आहे. प्रामुख्याने, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले जात आहे. प्रचार पत्रकेही वाटप होत आहेत. पोटनिवडणुकीत मनसे उमेदवाराला कॉँग्रेस,राष्टवादी कॉँग्रेसने पाठिंबा दर्शविला असल्याने प्रभागातील अन्य तिनही नगरसेवक मनसेच्या वैशाली भोसले यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. येत्या शनिवारी-रविवारी काही चौकसभांचेही नियोजन सुरू आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक