शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:28 IST

महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीसाठी मंगळवार (दि.१३) पासून प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होत असून दि. १३ ते २० मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, भाजपाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनाही रिंगणात उतरणार आहे,

नाशिक : महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीसाठी मंगळवार (दि.१३) पासून प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होत असून दि. १३ ते २० मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, भाजपाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनाही रिंगणात उतरणार आहे, तर मनसेने अद्याप संपर्क न साधल्याने राष्टÑवादीनेही उमेदवार देण्यासंबंधीचा अहवाल प्रदेशा-ध्यक्षांकडे रवाना केला आहे. कॉँग्रेसची भूमिका मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु, बिनविरोध निवडीची शक्यता जवळपास मावळली आहे.  प्रभाग क्रमांक १३ मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार दि. १३ ते २० मार्च या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. दि. १३ ते २० मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. रविवार, दि. १८ मार्च रोजी मात्र अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. २१ मार्च रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर दि. २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. २४ मार्चला उमेदवारांना चिन्हवाटप केले जाईल. त्याचदिवशी अंतिम उमेदवारांची यादी घोषित केली जाईल.  आवश्यकता भासल्यास दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असून, दि. ७ एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने बुधवार, दि. ७ मार्चपासूनच प्रभाग १३ मध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.‘पश्चिम’मध्ये अर्ज स्वीकृतीप्रभाग क्रमांक १३ हा पश्चिम विभागात असल्याने उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रही पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयातच स्वीकारले जाणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची तर सहायक म्हणून विभागीय अधिकारी नितीन नेर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांकडून ना हरकत दाखल्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक