शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थेट बांधावर  टरबुजाची  खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:27 IST

देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या बंधावर येऊ लागला आहे. येथील शेतकरी डाळिंबाची मोठी शेती करीत होता.

देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या बंधावर येऊ लागला आहे. येथील शेतकरी डाळिंबाची मोठी शेती करीत होता. त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात असल्याने त्यातूनही चांगली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी, अवकाळी पाऊस, गारपीट व हवामान बदल यामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. चालू वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगले आले; परंतु कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकºयांनी कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाट्याचे पीक घेतले जात होते; मात्र टमाट्याची गतही कांद्यासारखीच होत असल्याने अनेकवेळा शेतकºयांना टमाटे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. यामुळे येथील शेतकरी वेगळ्या पीकाकडे वळाला आहे. त्यातूनच त्यांना टरबूजची लागवड फायदेशीर वाटू लागली आहे. दोन वर्षांपासून कमी पाण्यातही येणाºया टरबूज व खरबूज पिकाकडे तरुण शेतकरी वळाला आहे. उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असते. ठिबक सिंचन, मिल्चिंग पेपरचा अवलंबू करून शेतकºयांनी खरबूज, टरबूजची लागवड केली आहे.  सध्या टरबूजला सहा ते सात रु पये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. एका टरबुजाचे वजन किमान पाच ते दहा किलोपर्यंत भरते, तेव्हा एका टरबुजाचे साधारणत: पंचवीस रु पये ते चाळीस रु पये शेतकºयाला मिळतात. टरबूज तोेडणीसाठी व गाडीत भरण्यासाठी माणसांची आवश्यकता असते. यामुळे गावातील स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध होत आहे. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज किंवा काकडी खाणे शरीरासाठी उपयोगी असते. टरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने परप्रांतीय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बांधावर येऊन भाव ठरवत आहेत. यामुळे शेतकºयाचे श्रम व वेळ आणि पैशांची बचत होत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी