शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:44 IST

पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़

ठळक मुद्दे ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीदुकानात काम करणारे सेल्समन, सेल्सगर्ल, कारागीर, शिपाई, सुरक्षारक्षक असे चौदा जण ताब्यात

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावा सापडू नये यासाठी दुकानातील सीसीटीव्हीच्या केबल कापून फुटेजचे तीन डीव्हीआर मशीनही चोरून नेले होते़ या चोरीत दुकानातील दोघा कर्मचाºयांसह आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी शनिवारी (दि़२३) पत्रकार परिषदेत दिली़निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील अ‍ॅक्सिस बँकेशेजारी अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे़ गुरुवारी (दि़२१) मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाच्या स्ट्राँगरुममधील तिजोरी उघडून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची धाडसी चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती़ या चोरीचा तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकातील अधिकारी कर्मचाºयांनी तिजोरीची बारकाईने पाहणी करून दुकानात काम करणारे सेल्समन, सेल्सगर्ल, कारागीर, शिपाई, सुरक्षारक्षक अशा चौदा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली़पोलिसांना दुकानात साफसफाईचे काम करणारा उंबरखेड रोडवरील हनुमान चौकातील विधी संघर्षित बालकाबाबत संशय आल्याने कसून चौकशी केली़ या मुलाकडे दुकानाची साफसफाई, दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या सर्व चाव्या वरच्या रुममध्ये ठेवणे व सकाळी दुकान उघडताना सर्व चाव्या मालकास आणून देण्याचे काम होते़ त्याची कसून चौकशी केली असता दुकानातील सेल्समन संजय देवराम जाधव (३२, रा़परसूल, ता़चांदवड) याच्या मदतीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली़संजय जाधव हा २०१५ पासून दुकानात कामास असल्याने त्याच्याकडे दररोज स्ट्राँगरूम उघडून दुकान लावणे तसेच रात्री दुकान आवरून दागिने तिजोरीत ठेवण्याचे काम होते़ या विधीसंघर्षित बालक व वाघ या दोघांनी तिजोरीतील चोरी केलेले दागिने बॅगमध्ये भरले़ वाघ याने ही बॅग चांदवड तालुक्यातील परसूल येथील भाचा संशयित गोपीनाथ दत्तू बरकले (२५) याच्याकडे देऊन लपवून ठेवण्यास सांगितले़ स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीची उकल करून हे सर्व दागिने हस्तगत केले़सराफी दुकानातील सोने चोरीप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात संशयित संजय वाघ, गोपीनाथ बरकले व विधीसंघर्षित बालक या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़