शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

व्यापारी भीतीग्रस्तबाजार समितीत लूट : कारवाईची मागणी

By admin | Updated: November 27, 2014 22:51 IST

व्यापारी भीतीग्रस्तबाजार समितीत लूट : कारवाईची मागणी

पंचवटी : वाहनाला कट मारल्याची कुरापत काढून दुचाकींवरून आलेल्या चौघा भामट्यांनी दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्याच्या वाहनातून जवळपास चार लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडल्याने सध्या व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण आहे. अवघ्या काही मिनिटांत रोकड चोरून दुचाकीवरून पलायन करणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रयत्न केला असला, तरी त्यांना तूर्तास यश आलेले नाही. रोकड चोरणारी टोळी यापूर्वीही बाजार समितीच्या आवारात कार्यरत होती व आजमितीसही असावी हे बुधवारी भरदिवसा बाजार समितीत घडलेल्या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीत येणाऱ्या व्यापारी तसेच शेतकऱ्यांची लूटमार होऊ नये, त्यांचा भाजीपाला, रोकड तसेच मोबाइल चोरी होऊ नये म्हणून बाजार समितीत पोलीस कर्मचारी तर नेमलेच आहेत, शिवाय त्यांच्या जोडीला बाजार समितीचे सुरक्षारक्षक आहेत. याशिवाय बाजार समितीच्या आवारात तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असले, तरी त्यानंतरही असे प्रकार घडत असल्याने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजार समितीत बसविलेल्या कॅमेऱ्यांपैकी काही कॅमेरे बंद असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजार समितीत दररोज शेकडो शेतकरी शेतमालाच्या लिलावासाठी येत असल्याने तेथे दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून तसेच धमकी देऊन लूटमार करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीदेखील धास्तावले आहेत. बाजार समितीत सायंकाळच्या वेळी वर्दळ असते. बाजार समितीत पोलीस कर्मचारीही तैनात असतात; मात्र पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाजार समितीत रोकड चोरीची घटना घडत असेल तर व्यापाऱ्यांनी काय करायचे, असा सवालही भयभीत व्यापाऱ्यांनी केला आहे. आगामी कालावधीत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बाजार समिती तसेच पंचवटी पोलिसांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले. (वार्ताहर)