शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीसाठी आजपासून बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:10 IST

महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देजादा वाहतूक : त्र्यंबकेश्वरसाठी ७० बसेसचे नियोजन

नाशिक : महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत. यात्रेचा प्रमुख दिवस शुक्रवार (दि.२१) असल्याने या दिवशी सर्वाधिक ५० बसेस विविध आगारांतून धावणार आहेत. त्र्यंबकेश्वर बरोबरच जिल्ह्यातील अन्य दहा ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांसाठीदेखील बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.महाशिवरात्र यात्रेनिमित्त दरवर्षी महामंडळाकडून भाविकांची प्रवासी वाहतूक केली जाते. त्र्यंबकेश्वरसह सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनाई, सोमेश्वर, दोधेश्वर, कपालेश्वर, सिद्धेश्वर, शिरसमणी, पारेगाव, नागापूर येथील शिवमंदिरांमध्येदेखील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणीदेखील बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वतीर्थ टाकेद आणि त्र्यंबकेश्वरसाठी दि. २० पासून सलग तीन दिवस, तर अन्य ठिकाणी दि. २० आणि २१ अशा दोन दिवसांसाठीच बसेस सोडण्यात येणार आहेत.त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांना नाशिक आगार-१, नाशिक आगार-२, कळवण, पेठ, पिंपळगाव येथून बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिकमधून दररोज ४५ ते ५० बसेस धावणार आहेत. तसेच अन्य आगारांमधून दोन ते तीन जादा बसेस सोडल्या जातील. दि. २० रोजी २४, २१ रोजी ५० आणि २२ रोजी २४ बसेस सोडण्यात येणार आहेत. भगूर बसस्थानकातून टाकेदसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पिंपळगाव, सिन्नर आणि नाशिक-२ मधूनही बसेस टाकेदला सोडण्यात येणार आहेत. घोटी येथून कावनाई आणि त्र्यंबकेश्वरला बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रा कालावधीत बसस्थानक तसेच तात्पुरत्या स्थानकात तातडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसस्थानकांसाठी काही ठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यात येणार आहे. टाकेद येथे निवारा शेड उभारले जाणार आहे. अनेक ठिकाणी तात्पुरती वीज जोडणीचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याचे टॅँकर्स देण्याची जबाबदारी आगारप्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ठिकाणी टॅँकर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.यात्रा कालावधीत राज्य परिवहन महामंडळाकडून जादा भाडे आकारणी केली जाते. त्यानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर प्रौढांना ४० रुपये, तर मुलांना २० रुपये याप्रमाणे भाडे आकारण्यात येणार आहे. इगतपुरी-टाकेद येथूनही ४० रुपये भाडे आकारले जाणार आहे. भगूर-टाकेद ४० रुपये, सिन्नर-टाकेद ८५ रुपये, घोटी-कावनाई १५ रुपये, पंचवटी सोमेश्वर १५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे