शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बसची साथ सुटल्याने गहिवरला चालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:43 IST

आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही.

ठळक मुद्देयापुढे बस सुटणार म्हणून त्यांनी लाडाकोडाने बसला सजविले.सेवाकाळातील अखेचा दिवस या बसच्या सोबतीने पूर्ण केल्याचे समाधान

नाशिक : आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही.एखाद्या चालकाला आपल्या बस विषयीचा इतका जिव्हाळा आणि आत्मियता असू शकते याची प्रचिती गिरणारे येथील एका कार्यक्रमात आली. पंचवटी-गिरणारे बसचे चालक राजेंद्र टोकसे हे ३० रोजी सेवानिवृट होत आहेत. यानिमित्ताने गिरणारे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात टोकसे यांनी मनाला भिडणारी आपली बस विषयीची ही भावना व्यक्त केली.त्यांनी हौस म्हणून बसची सजावट केली नाही तर आपल्या सेवा काळात बसशी जुळलेले ऋणानुबंध त्यांना अस्वस्थ करीत असल्याने यापुढे बस सुटणार म्हणून त्यांनी लाडाकोडाने बसला सजविले. त्यांनी बसकडे केवळ बस म्हणून कधीच बघितले नाही तर ही आपली जीवनवाहिनी आहे असेच ते सांगतात. जीवनाला आणि जगण्याला अर्थ देणारी बस ही आयुष्यातील एक अविभाज्य भाग असल्याने बसला विसरणे कधीही शक्य नसल्याने बसची सजावट त्यांनी केली. बसची सजावट करताना आपल्या मातेविषयी असलेली भावना बस विषयी असल्याचे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

बस मला मातेसमानरोजीरोटी नव्हे तर बस मातेसमान आहे. सेवाकाळात तिचा आशीर्वाद मिळाल्याने संसार झाला, दोन्ही मुले शिकली. आज जे काही आहे ते बसच्याच जिवावर. सेवाकाळातील अखेचा दिवस या बसच्या सोबतीने पूर्ण केल्याचे समाधान आहे. बस केवळ चालविली नाही तर तिची तन-मनाने सेवा केली. तिच्या कृपाशीर्वादामुळे उभा आहे. तिचे ऋण फेडण्यासाठी ड्यूटीच्या शेवटच्या दिवशी बस सजवून कृतज्ञता व्यक्त केली.- राजेंद्र टोकसे,चालक पंचवटी आगार

टॅग्स :NashikनाशिकTravelप्रवास