शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

बसची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:19 IST

बसची दुचाकीला धडक; एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : शहरातील कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयासमोर खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने दुचाकीस मागून धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला आहे.शेख रईस शेख सिराजुद्दीन (३०) रा. नांदेडी शाळेजवळ याने फिर्याद दिली. अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या दरम्यान कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयासमोर नॅशनल ज्युसजवळ फुले पुतळ्याकडून एकात्मता चौकाकडे जात असताना खासगी ट्रॅव्हल्स बसने पुढे चालणाऱ्या दुचाकीस (एमएच ४१ एई २३९९) धडक दिली. यात फिर्यादी शेख रईस शेख सिराजुद्दीन व शेख अकील शेख नजलेसाब (२५) रा. गुलशेरनगर हे दोघे जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेख अकील यांचा आज सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खासगी बसचालका-विरोधात अपघात करून फिर्यादीच्या दुखापतीस व साक्षीदाराच्या मरणास कारणीभूत झाला व अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.शेख अकील हा तरुण कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या मामांच्या आडत दुकानात डाळिंब पॅकिंगचे काम करीत होता. अकील हा स्वभावाने शांत व मनमिळवू होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गुलशेरनगर भागात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन बहिणी, आठ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.