शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकरातील ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 02:02 IST

सायखेडा : येथून जवळच असलेल्या शिंगवे येथे उसाच्या शेताजवळून जाणाऱ्या माल वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने रस्त्याच्या कडेला असणाºया विद्युत तारांना ओढल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : माल वाहतूक ट्रॅक्टरने तारा ओढल्याने शॉर्टसर्किट

सायखेडा : येथून जवळच असलेल्या शिंगवे येथे उसाच्या शेताजवळून जाणाऱ्या माल वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने रस्त्याच्या कडेला असणाºया विद्युत तारांना ओढल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीने मोठे नुकसान झाल्याच्या परिसरातील सर्वांत मोठी घटना आहे. शिंगवे येथील शंकर मोगल, नरहरी मोगल (गट नंबर ३९२) यांचे मालकीचे दीड एकर, जिजाबाई मोगल, विठ्ठल मोगल (गट नंबर ३९०,३९१) यांचे सव्वा एकर, तुकाराम रायते (गट नंबर ३८९) यांचे अर्धा एकर, हिरामण गिते (गट नंबर ५१४) यांचे दीड एकर, तर रामा रायते (गट नंबर ५१४, ५१५) यांच्या मालकीचा तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. धुराचे लोळच्या लोळ उठत असल्याचे बघून, आसपासच्या शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र जवळपास विहीर, बोरवेल नसल्याने पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. शिवाय विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने आग विझवता आली नाही. विशेष म्हणजे सर्व ऊस तोडणीसाठी परिपक्व झाले होते. अनेक शेतकºयांनी ऊस तोडणीसाठी इतर कारखान्यांना भेट देऊन व्यवहारदेखील केले होते. थोड्याच दिवसात तोडणी होऊन चार पैसे पदरात पडतील, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र लाखो रु पये खर्च करून आज सर्व अपेक्षांची राख झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. लाखो रु पयांचे नुकसान झालेले आहे भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गोदाकाठ भागात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. याच भागात विद्युत पुरवठा करणाºया तारा पसरलेल्या आहे तीन ते चार दशके जुन्या झालेल्या तारा आज धक्का बसला की तुटतात, असे शेतकरी सांगतात, मात्र यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. ऊसतोडणीसाठी आलेला असताना तालुक्यातील कारखाने बंद असल्याने दुसºया कारखान्यांच्या पाया पडावे लागत असल्याने ऊसतोडणीसाठी उशीर झाला आहे. त्यामुळे आजच्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी- रामा रायते.शेतकरी, शिंगवे