शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पेटलेले सिलिंडर फेकले मैदानात..

By admin | Updated: January 12, 2015 00:38 IST

टळला अनर्थ : जिगरबाज युवकांचे धाडस; राखले प्रसंगावधान

जुने नाशिक : वेळ साडेसहा वाजेची. ठिकाण नानावली. येथील टेकडीवरील लहान घरात अचानकपणे स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडर पेट घेतो. घरातील सर्व जण बाहेर पळतात. याच वेळी परिसरातील काही युवक धाडस करून घरात प्रवेश करतात आणि पेटलेले सिलिंडर सुरक्षितपणे मैदानात फेकण्यास यशस्वी होतात. पेटलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला असता तर भीषण आगीची घटना घडली असती; मात्र युवकांचे धाडसी प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होत होती.जुन्या नाशकातील अमरधाम रोडवर असलेल्या नानावलीच्या टेकडीवर असलेल्या लहान घरांपैकी सलीम राजमंहमद शेख यांच्या मालकीच्या घरात राहत असलेले भाडेकरू मुन्ना यांचा इण्डेन कंपनीच्या गॅस सिलिंडरने अचानकपणे पेट घेतल्याची घटना संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. घरातील सदस्यांनी तातडीने बाहेर पलायन केले व परिसरात सिलिंडर पेटल्याची ओरड केली. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या युवकांची या ठिकाणी गर्दी जमली. धाडसी तरुणांनी पेटलेले सिलिंडर घरात घुसून बाहेर आणले व टेकडीखालील मोक ळ्या जागेत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांवर फेकले. दरम्यान, सुदैवाने यावेळी सिलिंडरचा स्फोट झाला नसल्याने सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नानावलीच्या सदर टेकडीवर दाट लोकवस्ती असून, सर्व घरे एकमेकांना लागून आहेत. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ होऊन जीवितहानी झाली असती,पण सुदैवाने हा धोका टळला असता. सदर घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला कळविण्यात आल्याने अवघ्या दहा मिनिटांतच शिंगाडा तलाव मुख्यालयातील बंब घटनास्थळी पोहोचला. जवानांनी तत्काळ गॅस सिलिंडरवर पाण्याचा मारा सुरू केला अन् सिलिंडर फुटण्यापूर्वीच विझविले. अग्निशामक दलाच्या बंबाचे वाहनचालक देवीदास इंगळे, फायरमन संतोष आगलावे विजय नागपुरे, संजय कानडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. नानावली रस्त्याने आलेला बंब (एमएच १५ एबी ४०५१) हा गुमसुमबाबा चौकात रस्त्याचे काम सुरू असल्याने अडकला होता. (वार्ताहर)