शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: May 7, 2016 22:32 IST

तिघांना अटक : चार एलईडी टीव्हीसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लासलगाव : काही दिवसांपासून लासलगाव परिसरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या टोळीचा छडा लावण्यात लासलगाव पोलिसांना यश आले असून, तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून चार एलईडी टीव्हीसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथे घरे, बंगले घरफोडी करणाऱ्या चोरांनी लागोपाठ केलेल्या घरफोड्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते.सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व सहकारी पोलीस कर्मचारी लासलगाव व विंचूर परिसरात गस्त घालत असताना विंचूर ेयेथील साईबाबा मंदिर परिसरात एक कार संशयास्पद दिसून आली. पोलिसांना पाहताच संशयित चालकाने गाडीसह तेथून धूम ठोकली. पोलिसांचा संशय अधिक बळावला त्यानंतर गस्त अधिक कडक करण्यात आली. (एमएच ४ बी ८०४३) या सेंट्रो गाडीसह लासलगाव येथील अजय सुनील वडनेरे (सध्या रा. नेवगे कॉम्प्लेक्स, विंचूर ) व भाऊसाहेब संजय निकम (रा. गोंदेगाव) यांना लासलगाव येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी लासलगाव येथे सहा, तर विंचूर येथील दोन अशा आठ घरफोड्यांची कबुली दिली. यानंतर लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी त्यांचा अजून एक साथीदार मनोज राजेंद्र रणशूर (रा. गोंदेगाव ) यास अटक केली.लासलगाव येथील चोऱ्या उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करण्यात यश संपादन केल्याबद्दल निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे व पोलीस कर्मचाऱ्याचे लासलगावकरांनी अभिनंदन केले. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक आवारे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब बिन्नर, मुद्दसर शेख ,योगेश शिंदे, राजेश घुगे, संजीव मोरे, मधुकर उंबरे, वाल्मीक पवार, दीपक सांगळे व वैदकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या चोरांकडून पाळत ठेऊन बंद घरांना लक्ष्य केले जात होते. स्थानिक पातळीवरील गुन्हेगार असतील हा दावा बरोबर ठरला आहे.निफाड न्यायालयात या संशयितांना हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)