नाशिक : टेरेसच्या दरवाजातून प्रवेश करून सुमारे पंचवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नांदूर नाका परिसरात घडली आहे़वृंदावननगरमधील शामल रो-हाऊसमध्ये किरण परशराम पवार राहतात़ सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या टेरेसच्या उघड्या दरवाजातून चोरट्यांनी प्रवेश करून बैठक कक्षातून दोन मोबाइल फोन व एलईडी टीव्ही असा चोवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी किरण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
आडगाव शिवारातील वृंदावननगरमध्ये घरफोडी
By admin | Updated: September 11, 2015 23:16 IST