येवला : नगरसूल येथे देशी दारू दुकानातून मद्यासह दोन हजार रुपयाचा ऐवज चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सध्या नगरसूल परिसरात दुष्काळाचे गडद सावट असून, शेतमंजुराना हातात काम नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहेत. मात्र कायमस्वरूपी नशेत राहणारे तळीरामांनी मद्याच्या नशेत दुकान फोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी रात्री नगरसूल येथील देशी मद्याच्या दुकानाचे कुलूप तोडून दोन हजार रुपये व दुकानात दोन देशी मद्याच्या दोन बाटल्यामधील मद्य सेवन करीत पलायन केले. दुकानमालक अनिल निकम सकाळी दुकान उघडण्यास गेल्यानंतर रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
नगरसूल येथे चोरी
By admin | Updated: November 19, 2015 21:43 IST