येवला : तालुक्यातील उंदीरवाडी येथील धामणे नाल्यावरील सर्व आठ बंधारे पालखेडच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरल्याने जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना श्रेयवाद न करता सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी जातपात न बघता सदैव लढायला तत्पर असते. जनतेने शिवसेना गावा-गावात पोहचवण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी केले.शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजीराजे पवार, बाबासाहेब डमाळे, वाल्मीक गोरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदिंच्या हस्ते श्रीफळ व फुले वाहून जलपूजन करण्यात आले. सर्व बंधारे भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, हे शिवसेनेच्या उपोषणाला यश असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. पाणी मिळविण्यासाठी कसा संघर्ष करावा लागला याची विस्तृत माहिती संभाजी पवार यांनी दिली. उपतालुकाप्रमुख अमोल सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रतन बोरणारे, भागीनाथ थोरात, रामनाथ जमधडे, बापू दाभाडे, धीरज परदेशी, संजय सोमासे, सूर्यभान जगझाप, नारायण क्षीरसागर, चेतन देशमुख, पुंडलिक जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
धामणे नाल्यावरील बंधारे पाण्याने भरले
By admin | Updated: September 15, 2016 00:02 IST