शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कागदात गुंडाळून द्या ‘ओला’ कचरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:47 IST

महापालिकेने दि. १ एप्रिल २०१८ पासून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे करून घंटागाडीत न टाकणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांना पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ज्यांच्याकडे डस्टबिन नाहीत त्यांनी कागदामध्ये ओला कचरा गुंडाळून द्यावा, असे अजब तर्कट मांडले आहे. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

नाशिक : महापालिकेने दि. १ एप्रिल २०१८ पासून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे करून घंटागाडीत न टाकणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांना पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ज्यांच्याकडे डस्टबिन नाहीत त्यांनी कागदामध्ये ओला कचरा गुंडाळून द्यावा, असे अजब तर्कट मांडले आहे. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.स्थायी समितीची बैठक सभापती हिमगौरी अहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कॉँग्रेसचे समीर कांबळे यांनी महापालिकेने १ एप्रिलपासून घनकचरा विलगीकरणाबाबत लागू केलेल्या दंड वसुलीच्या निर्णयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कांबळे यांनी सांगितले, महापालिकेने १ एप्रिलपासून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे करून देण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, एकीकडे प्लॅस्टिक बंदी लागू झालेली असताना, ओला व सुका कचरा कसा द्यायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.  प्रामुख्याने, झोपडपट्टी भागासह सामान्य नागरिकांकडून डस्टबिनचा वापर होऊ शकणार नाही. महापालिकेने दंडात्मक वसुलीचा निर्णय घेताना ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी पर्यायही समोर ठेवण्याची गरज होती, असेही कांबळे यांनी सांगितले. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी ज्यांच्याकडे डस्टबिन नाहीत त्यांनी ओला कचरा कागदात गुंडाळून देण्याची सूचना केली. त्यावर सदस्यांनी आश्चर्य व्यक्त करत, ओला कचरा कागदात कसा राहील, असा सवाल उपस्थित केला. त्यावर डॉ. हिरे यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही.त्यामुळे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी ओला कचरा म्हणजे पाण्यात बुडविलेला कचरा नव्हे, असा खुलासा केला. परंतु, सदस्यांचे त्याने काही समाधान झाले नाही.महिनाभर चालणार प्लॅस्टिक पिशवीसहायक आरोग्याधिकाºयांनी प्लॅस्टिक बंदी लागू झाली असली तरी आणखी महिनाभर स्टॉक संपेपर्यंत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करता येणार आहे. त्या नष्ट व्हाव्यात याकरिता त्यांचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे. तोपर्यंत नागरिक प्लॅस्टिकची पिशवी वापरू शकतील. त्यानंतर त्यांनी कागदाचा वापर करावा, असेही हिरे यांनी सांगितले. दरम्यान, घंटागाडी ठेकेदारांनी नागरिकांना डस्टबिन पुरविणे बंधनकारक नसल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका