शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

बेशिस्त पालिका कर्मचाऱ्यांना दणका

By admin | Updated: December 25, 2014 01:23 IST

१८५ कर्मचाऱ्यांची बिनपगारी : नऊ जणांची रोखली वेतनवाढ; कामचुकार झाले अस्वस्थ

नाशिक : मागील महिन्यात पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेटलतिफांबरोबरच परवानगीशिवाय गैरहजर राहणाऱ्यांना हिसका दाखविला होता. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर पालिका प्रशासनाने चौकशीअंती १८५ कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा लावली असून, गैरहजर राहणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखून तशी सेवापुस्तिकेत नोंद करण्याचे आदेश काढले आहेत. महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्वप्रथम पालिकेच्या बेशिस्त कर्मचाऱ्यांना दणका देत वठणीवर आणले. आयुक्तांच्या आदेशानुसार दि. १५ व १७ नोव्हेंबर रोजी मनपा मुख्यालयासह शहरातील सहाही विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. या दोन्ही दिवशी सहाही विभागांमध्ये पालिकेचे सहायक आयुक्त, उपआयुक्त यांच्यामार्फत हजेरी मस्टर सकाळी १०.३० वाजताच ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. त्यात शनिवार दि. १५ नोव्हेंबरला ४९२, तर सोमवार दि. १७ नोव्हेंबरला २९२ कर्मचारी कार्यालयात काही गैरहजर आणि काही लेटलतिफ आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. महिनाभरानंतर या सर्व कर्मचाऱ्यांचे खुलासे प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी होऊन चौकशी करण्यात आली. त्यात दि. १५ नोव्हेंबर रोजी गैरहजर अथवा लेटलतिफ ४९२ कर्मचाऱ्यांपैकी ३६५ कर्मचाऱ्यांचे खुलासे मान्य करण्यात आले. उर्वरित १०६ कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा लावण्यात आली, तर ११ कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. दि. १७ नोव्हेंबर रोजी गैरहजर अथवा लेटलतिफ २९२ पैकी १९८ कर्मचाऱ्यांचे खुलासे मान्य करण्यात आले. त्यातील ७९ कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा लावण्यात आली, तर ६ कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. दि. १५ व १७ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी गैरहजर राहणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांचा खुलासा अमान्य करण्यात येऊन त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईबाबतची नोंदही संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी दिली. पालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)