शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने हल्ला करून बोकड केले फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 17:51 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देबागलाण : तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास घडली घटना

औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.येथील उद्धव रौंदळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या बोकडावर रात्री बिबट्याने हल्ला करु न तो फस्त केला. सकाळी रौदळ यांना हा प्रकार लक्षात आला बांधलेल्या ठिकाणी रक्त व बिबट्याचे ठसे आढळले.बोकडा ओढत हत्ती नदीच्या काठावर शेतात फडश्या पाडल्याचे लक्षात आले. त्याची वनविभागला माहिती मिळताच वनरक्षक गौतम पवार, गुलाब ठाकरे घटनास्ळी दाखल झाले व पंचनामा केला.येथील भागात रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने रात्री बिबट्या पशुधनाचा फडशा पाडत आहे. शेतांमध्ये सिंगलफेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुभतीजनावरे ही मोठ्या प्रमाणात आहेत. पण अचानक बिबट्याच्या वावर असल्याने पशुधन वेठीवर आले आहे. सायंकाळी बिबट्याच्या धाकाने सातच्या आत घरात जावे लागत आहे. तरी वन विभागाने अश्या श्वापदांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गावात व शेतात दररोज रात्री वीज गायब होत असल्याने सकाळी वीज येते. ह्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा रस्त्याने व गांवातही मुक्त संचार वाढला आहे. फोनही विजेअभावी चार्जी गं होत नसल्याने ग्रामस्थामधे संताप व्यक्त केला जात आहे.परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्र ही जागुन काढावी लागत आहे. मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत. यावर खबरदारीचे उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालवे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरतील शेतकºयांनी केले आहे.चौकट....मागील एक ते दिड महिन्यापुर्वी तरसाळी येथे विहिरीत बिबट्या पडला होता. वन विभागाने तो बाहेर काढताच पसार झाला. वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया येथील गावांजवळील कपाळे डोंगर व तरसाळी. मुंजवाड, औंदाणे गावाला लागुन हत्ती नदी आहे. येथे बिबट्याचा तीन-चार वर्षापासुन वावर आहे. पिकांचा आसरा, मुबलक गुरांची संख्या अशी कारणे आहेत.चौकट -येथील परिसरात शेतात वास्तव्यास राहणाºया शेतकºयांना वीज वेळेवर मिळत नाही. रात्री वीज गायब होत असल्याने बिबट्या परिसरात व शेतांमध्ये मुक्त फिरत आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. यामुळे शेतामध्ये सिंगल फेज योजना राबवावी, तसेच वन विभाग व वीज वितरण कंपनीने लक्ष घालावे.- प्रभाकर रौंदळ, उपसभापती सटाणा बाजार समिती, तरसाळी. 

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्या