शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कट्ट्यातून गोळी सुटून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: August 8, 2016 01:04 IST

मध्यरात्रीची घटना : संशयिताने गावठी कट्ट्यासह काढला पळ

 सातपूर : अवैधरीत्या आणलेला गावठी कट्टा आपल्या मित्राला दाखवत असताना कट्ट्यातून गोळी सुटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, सातपूर-अंबड लिंकरोडवर हिंद इंडस्ट्रीज वखारीच्या आवारात रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोघा परप्रांतीय मित्राकडे अनधिकृत गावठी कट्टा होता. त्या कट्ट्याची चाचणी घेत असताना अचानकपणे गोळी सुटली आणि यामध्ये बिहार राज्यातील युवक मंगल अनिरुद्ध मांझी (२४) या तरुणाचा मृत्यू झाला.याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणातील अन्य संशायितांचा शोध सुरू आहे. एकूण पाच संशयितांपैकी दोघांची नावे समोर आली असून उर्वरित तिघांचाही लवकरच सुगावा लागणार असल्याचा विश्वास सातपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत सातपूर गुन्हे शोध पथकाला सूचना देण्यात आल्या असून, लवकरच पाचही संशयितांना अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. कट्ट्यातून गोळी सुटताच मयताच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. या संशयितांनी घटनास्थळावरून गावठी कट्टाही पळविला आहे. बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रमेश दराडे यांनी रीतसर फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)