शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
2
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
3
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
4
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
5
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
6
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
7
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
8
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
9
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
10
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
11
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
12
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
13
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
14
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
15
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
16
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
17
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
18
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
19
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
20
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल

पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:16 IST

निफाड : कॉँग्रेस पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे त्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करा. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जोमाने करावे व अधिकाधिक माणसांपर्यंत पक्षाचा विचार कसा जाईल याची जाणीव ठेवून काम करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केले.

ठळक मुद्देमुजफ्फर हुसेन:निफाड तालुका कॉँग्रेसच्या आढावा बैठकीत आवाहन

निफाड : कॉँग्रेस पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे त्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करा. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जोमाने करावे व अधिकाधिक माणसांपर्यंत पक्षाचा विचार कसा जाईल याची जाणीव ठेवून काम करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुका कॉग्रेसची आढावा बैठक निफाड येथे कॉग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुजफ्फर हुसेन बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते, निफाड तालुका प्रभारी रमेश कहांडोळे, कॉँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अडसरे, निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, नाशिक शहर कॉग्रेसचे स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे होते. यांनी केले.याप्रसंगी तालुक्यातील कॉग्रेसच्या विविध सेलच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून तालुक्यात चालू असलेल्या कार्याचा आढावा दिला. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाभर सुरू असलेल्या पक्षकार्याची माहिती दिली. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांनी पक्ष बांधणी व पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी व युवकांमध्ये पक्षाची विचारधारा रु जवण्यासाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, याबद्दल सूचना केल्या. अनुसूचित जाती तालुक्याचे अध्यक्ष राजेश लोखंडे यांनी या माध्यमातून अनुसूचित जाती, तरु ण-बेरोजगारांसाठी काम सुरू असून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रि या शासनाच्या अनुसूचित जातीसाठी असलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम तसेच निवेदन व मोर्चे यांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करीत असल्याबद्दल माहिती दिली.राजाराम पांनगव्हाणे यांनी कॉग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास या तालुक्यात भक्कमपणे कॉँग्रेसची बांधणी होईल, यासाठी कार्यकर्त्यांना जे काही सहकार्य लागेल ते देण्यास तयार असल्याचे त्यांनीसांगितले.याप्रसंगी तुषार शेवाळे, शरद आहेर, दिगंबर गीते, मधुकर शेलार, साधना जाधव, राजेश लोखंडे, सचिन खडताळे आदींची भाषणे झाली.याप्रसंगी नगर जिल्हा कॉँग्रेसचे प्रभारी ज्ञानेश्वर गायकवाड, साहेबराव ढोमसे, रज्जाक शेख, सुनिल निकाळे, डॉ. विकास चांदर, सतीश पवार, शाम शिंदे, भैय्या देशमुख, माधव निचित, शकील शेख, गुणवंत होळकर, राजेंद्र बागडे, बाबासाहेब सोमवंशी, मधुसूदन आव्हाड, संपत कराड, नगरसेविका नयना निकाळे, राजेश लोखंडे ज्ञानेश्वर मोगल, राहुल जमधाडे, अझर मिर्झा, राहुल पवार, सुरज साळवे, राहुल नागरे, अनिल शिंदे, बापूसाहेब शिंदे, योगेश डुकरे, पृथ्वीराज मोगल, ज्ञानेश्वर मोगल, मीरा भार्इंदरचे युवक कॉग्रेसचे अध्यक्ष दीप काकडे आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण