शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आठ लाखांच्या थकबाकीमुळे पिंपळगावच्या बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:17 IST

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो ...

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो नंबर अस्तित्वातच नाही. अशा उत्तराने पिंपळगावचे नागरिक परेशान झाले आहे. फोन केला की नॉट रिचेबल सारख्या उत्तराने पिंपळगावकर हैराण झाले आहे.याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएल कंपनीने महावितरण विभागाचे बिलच भरले नसल्याने या टॉवरची वीज खंडित केली असल्याचा प्रकार उघडीस आल्याने बीएसएनएल कंपनीच्या नेटवर्कवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना नेटवर्कच अस्तित्वात नसल्याचा धक्काच बसला आहे.महावितरणकडून पिंपळगाव बसवंत येथील आठ बीएसएनएल टी.डी टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असून यामुळे या टॉवरवरून सुरू असलेली नेटवर्क सेवादेखील ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणकडून थकीत वीजबील ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी विभागांचादेखील समावेश आहे. पिंपळगावमधील बीएसएनएलच्या टी.डी टॉवरला आठ वीजमीटर होते .त्यांचे तब्बल ७ लाख ८३ हजार एवढे वीज बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेले वीजमीटरच बंद करण्यात आले आहेत.याबाबत बीएसएनएलला संपर्क केला असता बीएसएनएलच्या कार्यालयीन कामकाजाचा निधी दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून होते. निधी येताच आम्ही वीजबिल भरणार आहोत. दोन्ही सेवा सरकारी आहेत. आम्ही महावितरणशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. महावितरण विभागाकडून सिंगल फेज वीज जोडणी मिळाल्यास परिसरातील इंटरनेट सेवा सुरळीत करता येईल, असे सांगितले जात आहे.--बीएसएनएलकडून आठ वीजमीटरचे मिळून ७ लाख ८३ हजार रु पये एवढे वीजबिल थकीत आहे. ही थकबाकी २०१८ ते १९ या कालावधीतील आहे. त्यामुळे महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. थकीत वीजबिल भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- गायत्री गावित, सहाय्यक अकाऊंट , महावितरण विभाग.....................................बीएसएनएल वीज पुरवठा बंद केल्यामुळे तसेच महावितरण विभागाचे त्या संबंधित ट्रॉवरचे वीज बिल थकले असल्याने त्या परिसरातील नेटवर्क बंद आहे. आम्ही या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्र ार केली असून नेटवर्क लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत.-वर्षा भंगाळे, बीएसएनएल अधिकारी.............................जर ग्राहकांकडून मोबाईलचे बिल वेळेवर भरले जातात मग त्यांना योग्य नेटवर्कची सेवा का पुरवली जात नाही. ‘रेंज न मिळणे व सतत नेटवर्क ‘इमर्जन्सी कॉल्स ओन्ली’ अशा मोडवर जाणे. इंटरनेट स्पीड नसणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, हा सुद्धा पिंपळगाव मध्ये नेटवर्कचा सर्वात मोठा त्रास गेल्या कित्येक दिवसापासून आहे.-राजा बुब, त्रस्त नागरिक, पिंपळगाव बसवंत 

टॅग्स :Nashikनाशिक