जळगाव नेऊर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धुळगाव परिसरात बीएसएनएलच्या थ्रीजी सेवेचा प्रारंभ झाला. येवला येथील अभियंता अविनाश पाटील, एकनाथ गायकवाड यांनी सीमकार्ड वितरित करून सेवेस प्रारंभ केला. येवला तालुक्यातील बीएसएनएल भ्रमणध्वनीचे कृषी, विद्यार्थी, स्वाभिमान असे सर्वाधिक ग्राहक धुळगाव परिसरात होते. भारनियमन, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याने येथील ग्राहक त्रस्त होते. बीएसएनएलने आकर्षक योजना आणल्या. येवला शहर वगळता ग्रामीण भागात एकाही ठिकाणी थ्रीजी सेवा नव्हती; मात्र दर्जेदार सेवा मिळत नसल्याने येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहक खासगी दूरसंचार कंपन्यांकडे वळाले; परंतु अंदरसूल, जळगाव नेऊर, सावरगाव, नगरसूल व पाटोदा पाठोपाठ धुळगाव येथे थ्रीजी सेवा सुरू केल्याने परिसरातील ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
धुळगाव येथे बीएसएनएलची थ्रीजी सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:15 IST
जळगाव नेऊर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धुळगाव परिसरात बीएसएनएलच्या थ्रीजी सेवेचा प्रारंभ झाला. येवला येथील अभियंता अविनाश पाटील, एकनाथ ...
धुळगाव येथे बीएसएनएलची थ्रीजी सेवा सुरू
ठळक मुद्दे जळगाव नेऊर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धुळगाव परिसरात बीएसएनएलच्या थ्रीजी सेवेचा प्रारंभ झाला. येवला येथील अभियंता अविनाश पाटील, एकनाथ गायकवाड यांनी सीमकार्ड वितरित करून सेवेस प्रारंभ केला. येवला तालुक्यातील बीएसएनएल भ्रमणध्वनीचे कृषी, विद्यार्थी, स्