शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला कालवा पाण्यासाठी थेट विमोचक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:46 IST

अंदरसुल : पालखेड धरण समुहातील पालखेड डावा कालवा अंदरसुल (ता. येवला) येथील कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन घोडके वस्ती बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक (आऊटलेट) मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

अंदरसुल : पालखेड धरण समुहातील पालखेड डावा कालवा अंदरसुल (ता. येवला) येथील कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन घोडके वस्ती बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक (आऊटलेट) मंजूर झाला आहे.सदर बंधाºयावरील लाभधारक शेतकरी व शेतमजूर यांनी अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच प्रा विनिता सोनवणे उपसरपंच वैशाली जानराव आणि सदस्यांनी आमदार छगन भुजबळ यांच्याकडे सदरचे विमोचक मंजूर करण्यात येण्यासाठी वेळोवेळी मागणी केली होती.सदरचे विमोचक बांधून झाल्यावर परिसरातील नागरिकांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पालखेड धरण समुहातील धरण परिसरात जास्त पाऊस झाल्यानंतर खरिप हंगामात पालखेड डाव्या कालव्यातुन पुर पाणी सोडले जात असत. या पाण्यातुन पालखेड डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रातील नदी-नाल्यावर असलेले बंधारे भरु न देण्यात येत असतात.परंतु अंदरसुल येथील कोळगंगा नदीवरील घोडके वस्ती ब्रिटिश कालीन बंधारा भरण्यासाठी विमोचक नसल्याने अडचण येत होती. त्यामुळे सदर परिसरातील जनतेला पाणी कमी मिळत असे, म्हणून सदर ठिकाणी विमोचक होणे अत्यंत आवश्यक होते.सदर विमोचक मंजुर होऊन लवकर काम सुरू केल्यास परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सदर प्रसंगी विजय जाधव, सुमीत एंडाईत, तुषार एंडाईत, सागर एंडाईत, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.