शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन ‘डकोटा’चे ओझर विमानतळावर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:41 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी छोटेखानी समारंभात त्याचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देवायुसेनेकडून स्वागत : एअर शोसाठी आज झेपावणार बंगळुरुला

ओझर : स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी छोटेखानी समारंभात त्याचे स्वागत करण्यात आले. एक दिवस मुक्कामी राहून शनिवारी (दि.९) ते बंगळुरूकडे झेप घेईल व तेथे दि. २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एअर शोमध्ये विविध कवायती सादर करेल.डकोटाचे दि. ५ फेब्रुवारीलाच ओझरला आगमन होणार होते परंतु बंगळुरूत ज्या ठिकाणी सदर विमान उतरणार होते तेथे मिराज-२००० हे लढाऊ विमान कोसळल्याने रणवे बंद होते. त्यामुळे शुक्रवारी (दि.८) ते ओझर येथे दाखल झाले. डकोटाचा आगमन सोहळा भारतीय वायुसेनेच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय वायुसेनेचा अमूल्य ठेवा म्हणूनदेखील डकोटाला संबोधले गेल्याने नाशिकच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण होता.१९४० च्या सुमारास डकोटा लढाऊ विमान हे इंग्लंडमध्ये बनवले गेले. आठ दशकांपूर्वी याला बनवायला जवळपास सहाशे हजार युरो इतका खर्च आला होता. त्याकाळी तेथील सरकारने भारतातल्या काही पायलटांना प्रशिक्षण दिले. याची विशेष कामगिरी म्हणजे १९४७ या युद्धात पहिल्या शीख रेजिमेंटची वाहतूक याच विमानाने केली गेली होती. त्यानंतर शस्त्रांची व जवानांची ने-आण करण्यास डकोटाने महत्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिशकालीन असलेल्या डकोटचे अनेक वर्षांपासून वापर करणे बंद झाले होते. डकोटा ही ब्रिटिशांची देण असली तरी सद्यस्थितीत त्याचे उड्डाण होण्यासाठी त्यात केलेले आमूलाग्र बदल हे भारतात केले आहे.तिसरा मान महाराष्टÑाला१९७० नंतर डकोटाचा वापर जवळपास बंदच झाला होता. मात्र, त्यात अंतर्गत बदल केल्यानंतर त्याचे पहिल्या सराव उड्डाणाचा मान गुजरातमधील जामनगर धावपट्टीला मिळाला. त्यानंतर दुसरे सराव उड्डाण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद धावपट्टीवर झाले तर तिसरा मान ओझर विमानतळाच्या रुपाने महाराष्टÑाला प्राप्त झाला आहे. ही महाराष्टÑाप्रमाणेच नाशिकच्या दृष्टीनेही आनंदाची बाब मानली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकairforceहवाईदल