कसबे सुकेणे : तालुक्यातील चितेगाव फाटानजीक लालपाडी येथे एक महिना महानुभाव पंथीय ब्राविद्या प्रवचन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तयारीनिमित्त नुकतीच संतमहंत व सद्भक्त यांची बैठक संपन्न झाली. महानुभाव पंथीय तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने लालपाडी येथे ब्राविद्या प्रवचन होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनसंबंधी चर्चा करण्यासाठी नाशिक येथील मोरवाडीच्या दत्त मंदिरात महानुभाव पंथीय संत-महंताची बैठक झाली. याप्रसंगी उपाध्य कुलाचार्य महंत वर्धस्थ बीडकर बाबा (रणाईचे) महंत सरळबाबा, महंत हिवरखेडकर बाबा, महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर, महंत जयराज बाबा, महंत चिरडेबाबा, प्रकाश नन्नावरे, लक्ष्मण जायभावे, सुकदेव गामणे, भास्कर सोनवणे, राजेंद्र जायभावे, भिकाभाऊ सोनवणे आदिंसह मोरवाडी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्राविद्या प्रवचन सोहळा बैठक
By admin | Updated: May 11, 2014 00:24 IST