शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

संरक्षक कठड्यांअभावी पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:33 PM

इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना ...

ठळक मुद्देइगतपुरी : भावली धरणाजवळ पर्यटकांची संख्या वाढली

इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत अथवा जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.तालुक्यात पर्यटनाचा विकास पहाता भावली धरण व या भागातील धार्मिक स्थळांना भेट देण्याकरिता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलीसह पर्यटकांची कायम गर्दी असते. भावली, बोर्ली, जामवाडी, मानवेढे, फांगुळगाव, नांदगाव सदो, पिंपरी संदो, जामुंडे, गवांडे आदींसह बारा वाडी-वस्तीच्या ग्रामस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचा पूल तयार केला; पण त्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत वा कोणता अधार नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटना घटल्या आहेत. शाळकरी मुलांचेदेखील अनेक अपघात झाले आहेत. मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे यांनी याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. मात्र या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत आहे. पर्यटकांच्या आणि ग्रामस्थांच्या जीविताची सुरक्षा म्हणून या पदाचारी पुलाला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे, अशी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. सदर पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम येत्या काही दिवसात सुरू झाले नाही तर या भागातील सर्व ग्रामस्थ जनअंदोलनाचा पवित्रा घेतील, असे मेंगाळ यांनी सांगितले. यावेळी माजी आमदारमेंगाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान आडोळे, मुंबई येथील प्रभू नयन फाउण्डेशनचे आनंद मवाणी, माजी नगरसेवक यशवंत दळवी, पं. स.चे माजी सदस्य नंदलाल भागडे, मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे, दादा पाटील भागडे, जयराम गव्हाणे आदी उपस्थित होते. पुलाजवळ धनुष्यतीर्थ स्थान असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक विधी व यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. हजारो भाविक यात्रेला येतात, तर अनेक प्रकारची दुकाने या पुलावरच थाटतात. त्यात दररोज लहान-मोठी वाहने मार्गक्र मण करत असतात. यात मोठी दुर्घटना होणे शक्य असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे किंवा भिंत उभारावी याकरिता महाशिवरात्र यात्रेच्या दिवशी माजी आमदार मेंगाळ व पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान आडोळे, सरपंच भाऊराव भागडे, पं.स.चे माजी सदस्य नंदलाल भागडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भागडे यांनी प्रत्यक्ष पुलाची पहाणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करीत या विषयाबाबत सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :Governmentसरकारdam tourismधरण पर्यटन