शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगेवरील पूल कठड्यांविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:24 IST

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे अनुचित घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने पुलाची दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक कठडे व जाळ्या लावण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. साधारण कोणताही पूल बांधला म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे असणे गरजेचे असते. त्यामुळे पुलावरून पादचारी व वाहनधारकांना धोक्याचा अंदाज घेऊन प्रवास करणे सुकर होते. मात्र, दमणगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल सद्य:स्थितीत दोन्हीही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक ठरत आहे. रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात या पुलावरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात पुलावरून वाहते पाणी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ हे सर्वाधिक दुर्गम गाव. दमणगंगा नदीने चारही बाजूने वेढा घातलेल्या या गावाचा पावसाळ्यात चार महिने इतर गावांशी संपर्कतुटत असे. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत आंबापणी ते बोंडारमाळ हा जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता जंगलातून काढण्यात आला, तर दमणगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या पुलावरील कठडे दोन वर्षातच पुराच्या पाण्याच्या वाहून गेले. त्यामुळे पूल धोकेदायक बनला आहे.दमणगंगा नदी पावसाळ्यात रौद्ररूप धारण करत असते. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अधिक पाऊस झाल्यास पुलावरून पावसाचे पाणी वाहते. त्यामुळे पाण्यातून मार्गक्र मण करताना प्रवाशांना पुलाच्या रुंदीचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव आहे.शिवाय पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरून पादचारी वाहून जाण्याचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक