शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्रीसदो गावाजवळ पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:31 IST

इगतपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

इगतपुरी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.भाम धरण, परिसरातील प्रख्यात धबधबे व निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इगतपुरी महामार्गावरील भावली धरणाकडे जाणारा मार्गच पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रोखला होता. भावलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहने रोखल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पंचायत समिती उपसभापती भगवान आडोळे यांच्यासह शिष्टमंडळाने या भगदाड पडलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच या परिसरात शेतीलगत अनेक घरांनाही पुराच्या पाण्याने वेढले आहे.दरम्यान, पिंप्रीसदो मार्गावरील चारही बाजूने पुराच्या पाण्याने परिसर व्यापला असून, या परिसरातील पंढरीनाथ जंगलू भागडे यांच्या घरालाही पूरपाण्याने वेढा दिला असून घराभोवती भातशेती गेल्या १५ दिवसांपासून पाण्याखाली आहे.भात रोपांची नासाडीतालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जलमय स्थिती असल्याने भाताच्या रोपांची पूर्णपणे नासाडी झाली असून, गेल्या १५ दिवसांपासून भातशेती पूर्णपणे पाण्यात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खर्च वाया गेल्याने शेतकºयांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ पंचनामे करावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, तसेच संकटात सापडलेल्या शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूर