शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका येथील रुग्णालयात अज्ञातांकडून मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:40 IST

नाशिक : कोरोनाबाधितांना जीवनदान देण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक जोखीम पत्करून कामे करत असताना त्यांच्यावर चोवीस तासांत तीन ठिकाणी हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात मध्यरात्री आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. मात्र यंत्रणेने दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे अश्वासन दिल्यानंतर सामाजिक बांधिलकी आणि मानवजातीवर आलेल्या संकटामुळे वैद्यकीय व्यावसायिक सेवा कायम करणार असल्याची ग्वाही आयएमएने दिली.

ठळक मुद्देवैद्यकीय क्षेत्रात संताप : अज्ञात हल्लेखोरांवर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : कोरोनाबाधितांना जीवनदान देण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक जोखीम पत्करून कामे करत असताना त्यांच्यावर चोवीस तासांत तीन ठिकाणी हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात मध्यरात्री आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. मात्र यंत्रणेने दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे अश्वासन दिल्यानंतर सामाजिक बांधिलकी आणि मानवजातीवर आलेल्या संकटामुळे वैद्यकीय व्यावसायिक सेवा कायम करणार असल्याची ग्वाही आयएमएने दिली.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून उपचार करताना वैद्यकीय व्यावसायिकांचाही कस लागत आहे. दरम्यान, अशा स्थितीत शहरातील सातपूर, इंदिरानगर आणि मुंबई नाका येथे तीन ठिकाणी डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले. मध्यरात्रीच्या सुमारास मानवता रुग्णालयात अज्ञातांनी मोडतोड केल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात रुग्णालयाच्या फिर्यादीवरून आठ ते दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध वैद्यकीय सेवा नुकसान व हानी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावाच्या हल्ल्यात अतिदक्षता विभागाची काच फुटली आणि सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर काही समाजकंटकांनी दगड फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पुढील तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, या घटनेनंतर सकाळीच आयएमएच्या नाशिक शाखेने गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. दोषी व्यक्तींवर कारवाई करावी आणि रुग्णालयाला चोवीस तास संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी दोेषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. कोविड हॉस्पिटल्स आणि संबंधित पोलीस ठाणे यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्वरित आदेश काढण्यात येईल, असेही आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, राज्य कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. सारिका देवरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.रुग्णालयात १५ एप्रिल रोजी रोशन घाटे हा रुग्ण दाखल झाला होता. त्यावर प्लाझ्मा थेरपीपासून सर्वतोपरी उपचार करून कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्यात यश आले नाही.- डॉ. राज नगरकर, मानवता रुग्णालयरुग्णालयातील तोडफोडीशी नगरसेविका प्रियांका घाटे यांचा कोणताही संबंध नाही. रुग्णालयात झालेली तोडफोड आणि दगडफेकीसंदर्भात करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. रुग्णालयाची बाजू सावरण्यासाठी तसेच चुकांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे आरोप करण्यात येत आहेत.- किशोर घाटे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी