शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या मूर्ती कामासाठी शाडूमातीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:13 IST

नाशिक : भारतासह संपूर्ण जगावर ओढवलेले कोरोनाचे विघ्न टळू दे, यासाठी विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले जात असतानाच येत्या आॅगस्टमध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तिकामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. पण लॉकडाउनमुळे विशेषत: भावनगर गुजरात येथून येणाºया शाडूमातीला तूर्त ब्रेक बसला आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्याही चिंता वाढल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचे विघ्न । लॉकडाउनमुळे वाहतूक ठप्प; माल येण्यास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतासह संपूर्ण जगावर ओढवलेले कोरोनाचे विघ्न टळू दे, यासाठी विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले जात असतानाच येत्या आॅगस्टमध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तिकामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. पण लॉकडाउनमुळे विशेषत: भावनगर गुजरात येथून येणाºया शाडूमातीला तूर्त ब्रेक बसला आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्याही चिंता वाढल्या आहेत.यावर्षी २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणपतीमूर्ती तयार करण्याच्या कामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. दरवर्षी मूर्तिकार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मूर्तिकामास प्रारंभ करतात. पीओपीच्या मूर्ती बाहेरून येत असल्या तरी नाशिकमध्ये शाडूमातीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. त्यामुळे शहरातील काही मूर्तिकार शाडूमातीपासून मूर्तिकामाला प्राधान्य देतात. मूर्तीसाठी लागणारी शाडूमाती ही भावनगर, गुजरात येथून आणली जात असते.ेकाही मूर्तिकारांनी मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच आॅर्डर देऊन ठेवल्याने त्यांचा माल नाशकात येऊन पोहोचला आहे; पण बºयाच मूर्तिकारांना अद्याप माल आलेला नाही. साधारणपणे गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी ट्रान्सपोर्टने माल येऊन पोहोचतो; पण कोरोनामुळे देशभर लॉकडाउन सुरू असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे माल येणे थांबले आहे. परिणामी मूर्ती कामालाही वेग मंदावला आहे.कोरोनाचे विघ्न कधी दूर होईल याबाबत अनिश्चितता आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास त्याचा मोठा परिणाम एकूणच अर्थकारणावर होणार आहे. हा कालावधी लवकर संपला नाही तर मूर्तिकामावरही त्याचा परिणाम होऊन मूर्तीची टंचाई भासण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आमचे कुटुंब गेल्या चार पिढ्यापासून शाडूमातीपासूनच मूर्तिकाम करत आले आहेत. आम्ही डिसेंबरमध्येच आॅर्डर देऊन ठेवल्याने आमच्याकडे पुरेसा माल आहे. लॉक डॉउनमुळे माल येणे थांबला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्यामुळे मागणीनुसार मूर्तिकाम सुरू केले आहे. कोरोनाचे हे विघ्न लवकर दूर होवो, ही प्रार्थना. - मयूर मोरे, मूर्तिकार, नाशिक

 

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या