शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा भंग; जिल्ह्यात ४७० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:09 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून विविध प्रकारच्या ४७० तक्रारी जिल्हा निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद निवडणूक शाखेने घेतली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीची जबाबदारी टाळणाºया काही कर्मचाºयांवरदेखील आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक शाखेकडून नोंदकामचुकार कर्मचाऱ्यांचाही समावेशपोलिसांकडून ४५ तक्रारी प्राप्त

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून विविध प्रकारच्या ४७० तक्रारी जिल्हा निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद निवडणूक शाखेने घेतली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीची जबाबदारी टाळणाºया काही कर्मचाºयांवरदेखील आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यात आली आहे.निवडणूक जाहीर झाल्यानंतर लागलीच आचारसंहिताही लागू होत असल्याने निवडणूक शाखेकडून याबाबतच्या तक्रारींसाठी तत्काळ आचारसंहिता कक्षाची स्थापना केली होती. त्यानुसार अगदी आचारसंहिता लागू होण्याच्या पहिल्याच दिवशी तक्रार प्राप्त झाली होती. तेव्हापासून सुरू झालेला आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणाच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. मागील आठवड्यात ३९२ असलेल्या तक्रारींचा आकडा या आठवड्यात साडेचारशेच्या पुढे गेला आहे. तक्रार करणाºयांमध्ये निवडणूक रिंगणातील अपक्ष उमेदवारांचादेखील समावेश असून, जिल्ह्यात दररोज कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातील अपक्षांकडून आक्षेप नोंदविणारे अर्ज दाखल होत आहेत.विनापरवाना वाद्य वाजविणे, पचारासाठी विनापरवाना वाहन वापरणे, फलकबाजी, प्रचाराच्या गीतांमधून उल्लंघन होण्याचा संशय, विनापरवाना गर्दी जमविणे, विनापरवाना मेळावा घेणे, विनापरवाना लाउडस्पीकर लावणे, बेकायदेशीर मद्याची वाहतूक तसेच रात्री दहा वाजेनंतर वाद्य वाजविल्या प्रकरणाच्या अनेक तक्रारी निवडणूक शाखेला प्राप्त झालेल्या आहेत. तडीपार गुंड मतदारसंघात दिसल्याप्रकरणाच्या देखील तक्रारी अनेकांनी केलेल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या प्राप्त झालेल्या तक्रारंींपैकी अनेक तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत.निवडणूक शाखेकडे प्राप्त झालेल्या ४७० तक्रारींपैकी शहर पोलीस आयुक्तालयाकडून ४५ तक्रारींची नोंद करण्यात आली तर पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी २०९ विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाबाबतच्या तक्रारींची माहिती निवडणूक शाखेला दिलेली आहे. विनापरवाना मद्याची वाहतूक, जवळ बाळगणे तसेच दारूभट्टीवरील दारू बनविल्या प्रकरणाच्या तक्रारींचीदेखील नोंद करण्यात आलेली आहे.अन्य तक्रारींचे स्वरूपकोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही शस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणाच्या १२ तक्रारींची नोंद करण्यात आलेली आहे. याप्रकरणी या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले आहे. अंदाजे ६,४०० लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. नाकाबंदी तसेच मिळालेल्या माहितीवरून करण्यात आलेल्या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणावर मद्याची कारवाई करण्यात आलेली आहे. सुमारे ५० लाख रुपयांचा हा सर्व मुद्देमाल असून, हे सर्व जमा करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणांहून १५ लाखांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आलेली आहे.सी-व्हिजिलवर केवळ सात तक्रारीसर्वसामान्यांना आचारसंहिता भंग प्रकरणी तक्रार करावयाची असल्यास किंवा फोटोग्राफ, व्हिडीओद्वारे सत्यपरिस्थितीची माहिती देण्यासाठी निडणूक काळापुरते निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल अ‍ॅप तयार केले असून, या माध्यमातून सर्वसामान्यांना थेट तक्रार नोंदविता येणार असून, त्यासाठी कोणत्याही विभागात किंवा अधिकाºयांसमवेत जाण्याची गरज नसते. जिल्ह्यात आजवर या अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. अन्य काही तक्रारी आहेत. या तक्रारीत तथ्य नसल्याने निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय