शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

सैनिकांच्या शौर्यामुळे देशात शांतता नांदते : राष्टपती रामनाथ कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 18:29 IST

आर्मी एव्हीएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना दिली. तर संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंग बावा भल्ला यांनी केले. ‘प्रेसिडेंट कलर्स’ला मानवंदना देण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांना ध्वज प्रदान केला.

ठळक मुद्देआर्मी एव्हीएशन ‘प्रेसिडेंट कलर्स’ने सन्मानितआर्मी एव्हीएशनला २७३ सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सैन्याच्या हवाई दलाने गेल्या ३२ वर्षांत भारतातच नव्हे जगात उत्तम कामगिरी बजावली असून, देशाच्या लष्करी क्षमतेत सिद्धता निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सैनिकांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. गांधीनगर येथील आर्मी एव्हीऐशन ट्रेनिंग स्कूलचा राष्टÑपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर्स’ या ध्वजाने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

गांधीनगरच्या आर्मी ऐव्हीएशन ट्रेनिंग स्कूलच्या लष्करी मैदानावर झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमास महाराष्टÑाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, लेफ्टनंट जनरल पी. एस. राजेश्वर, लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लेफ्टनंट जनरल कंवलकुमार, मधुलिका रावत आदी उपस्थित होते. राष्टÑपती कोविंद पुढे म्हणाले, सैन्याच्या हवाई दलाने गेल्या ३२ वर्षांत अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हीएशनला २७३ सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल, अशी कामगिरी या सैनिकांनी केली. गेल्या वर्षी आपण सियाचीन भागातील कुमार चौकीस भेट दिली. तेव्हा आव्हानात्मक स्थितीची जाणीव झाली. २० हजार आणि त्याहून अधिक उंचीवर वैमानिक कार्यरत असतात. देशात आपण शांततेत वास्तव्य करतो. सीमेवरील शूर जवानांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते. असे सांगून राष्ट्रपतींनी श्रीलंकेमधील ‘आॅपरेशन पवन’ आणि येमेनमधील ‘आॅपरेशन मेघदूत’मध्ये आव्हानात्मक परिस्थितीत या दलाने अतुलनीय कामगिरीचा तसेच संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत भारताचे दूत म्हणून जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आर्मी एव्हीएशन जवानांचा पराक्रम भारतीय सेनेचे जवान आणि अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत आहे, असेही ते म्हणाले. आर्मी एव्हीएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.यावेळी आर्मी एव्हीएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना दिली. तर संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंग बावा भल्ला यांनी केले. ‘प्रेसिडेंट कलर्स’ला मानवंदना देण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांना ध्वज प्रदान केला. या ऐतिहासिक सोहळ्याचे निशाण स्वीकारले. आकाशातून तीन ध्रुव हेलिकॉप्टरच्या समन्वय कृतीने ध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी आणि आर्मी एव्हीएशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षNashikनाशिक