शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपीचे धडे

By admin | Updated: July 21, 2014 00:42 IST

कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपीचे धडे

 

नाशिक : ट्रिबल्स आणि नाशिकरोड कारागृह प्रशासन यांच्या वतीने कारागृहात प्रथमच ब्राह्मी लिपी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे नाशिकरोड कारागृह देशातील पहिले कारागृह ठरले आहे. ट्रिबल्स या पुरातन भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने कारागृहात उपक्रम राबविण्यात आला. तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात ८० पुरुष कैदी आणि १५ महिला कैद्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप कारागृहाच्या सभागृहात पार पडला. कलागुण, कौशल्य आणि शिक्षण याला चार भिंतींच्या आत कधीही कैद करता येत नाही. संधी मिळाली तर या सृजनशीलतेचा आविष्कार नेहमीच घडतो. अशी संधी बंदीबांधवांना कारागृहातून दिली जाते. त्यातून व्यक्त होणाऱ्या त्यांच्या भावना मनाला स्पर्श करणाऱ्या ठरतात, असे प्रतिपादन कारागृह उपअधीक्षक वैभव आगे यांनी केले. नाशिकरोड कारागृहातील हे प्रशिक्षण भारतातील पहिला प्रयोग असल्याचेही आगे म्हणाले. कारागृह प्रशासनाने दाखविलेली तयारी आणि बंदीबांधवांनी तीन दिवसांत आत्मसात केलेली ब्राह्मी लिपी पाहून आत्तापर्यंत सदर लिपी शिकलेल्या तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये कारागृहातील विद्यार्थी लक्षणीय ठरले, असे ट्रिबल्स संस्थेचे अतुल भोसेकर म्हणाले. कैद्यांनी ब्राह्मी भाषेत लिहिलेले सुविचार, राष्ट्रगीत आणि काढलेले चित्र पाहून त्यांच्यातील भावना संवेदनशील असल्याचेही भोसेकर म्हणाले. यावेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी वसंत वानखेडे, तरुंग अधिकारी के. पी. भवर, गावित, तसेच ट्रिबल्स संस्थेचे सचिव चव्हाण, अभिनव लोखंडे, मैत्रयी भोसेकर, रेखा खरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)