शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

त्र्यंबकमध्ये ब्रह्मगिरी परिक्रमेस प्रारंभ

By admin | Updated: August 30, 2015 22:52 IST

त्र्यंबकमध्ये ब्रह्मगिरी परिक्रमेस प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून हजारो भाविक दाखल झाले आहेत. सिंहस्थ पर्वणीप्रमाणे परिक्रमेसाठीही सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रत्यक्ष शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दर श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी फेरी मारण्यासाठी शिवभक्त येतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा तिसऱ्या श्रावणी सोमवारपूर्वी दोन दिवस अगोदर सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी पार पडली. त्यानंतर रविवारी दुपारपासूनच हजारोंच्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. दरम्यान, त्र्यंबकमधील हॉटेल, लॉजेस सज्ज झाली असून, ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. मंदिर व परिसरात अन्य प्रसाद व इतर पूजा साहित्य, खेळणी व भेटवस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकमध्ये पाऊस असल्याचा त्र्यंबकवासीयांचा अनुभव आहे; परंतु रविवारी मात्र शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी मध्यरात्रीपासून बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी फेरीस प्रारंभ केला आहे.