शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मचैतन्य महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:09 IST

शंकराचार्य न्यास आणि भूपाली क्रिएटीव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून ब्रह्मचैतन्य संगीत महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली.

नाशिक : शंकराचार्य न्यास आणि भूपाली क्रिएटीव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून ब्रह्मचैतन्य संगीत महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. पं. फिरोझ दस्तूर यांचे शिष्य पं. चंद्रशेखर वझे यांनी पुरीया रागातील मैफलीने या महोत्सवाचा प्रारंभ केला.गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे चिन्मय मिशनचे स्वामी अद्वैतानंद, रवींद्र वाडेकर आणि संयोजक संदीप आपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सुरु वातीला पं. वझे यांच्या गायनाची मैफल झाली.त्यांनी मैफलीच्या प्रारंभी पुरीया रागातील आज मोरे घर आयो सगुण रूपमें साक्षात परब्रह्म... ही एकतालातील विलंबित बंदिश सादर केली. बीत गयो जनम तिहारो... या तीनतालातील द्रुत बंदीशीनंतर तराणा पेश केला. मधुकंस रागातील झपतालात देहो दरस मोहें राम...ही मध्य लयीतील बंदीश रंगली. सुनो मेरी विनती प्रभूजी....या द्रुत तीन तालातील बंदीशीनंतर संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानियांचा राजा या अभंगाने त्यांनी मैफलीचा समारोप केला. त्यांना तानपुरा साथ शरयू माथूर व मनोज कट्टी यांनी, तर ऋग्वेद देशपांडे यांनी तबलासाथ व ज्ञानेश्वर सोनवणे संवादिनीवर साथसंगत करून मैफलीची रंगत वाढवली.गायनानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पं. रूपक कुलकर्णी यांनी सोलो बासरीवादन केले. त्यांना संदीप आपटे यांनी बासरीवर, तर तबल्यावर तेजोवृष जोशी यांनी दमदार तबला साथ दिली. रूपक यांनी स्वर्गीय सुरावटीद्वारे श्रोत्यांना थेट वृंदावनात नेऊन सुरेल अनुभूती दिली. यावेळी पदाधिकारी व रसिक उपस्थित होते.आज विविध कार्यक्रमरविवारी (दि.२४) संध्याकाळी ५ वाजता सुजित काळे यांचे सोलो तबलावादन होणार आहे. त्यानंतर सुमुखी अथणी या कथक नृत्याविष्कार सादर करतील, तर महोत्सवाची सुरेल सांगता प्रा. डॉ. अविराज तायडे यांच्या बहारदार गानमैफलीने होईल. या संगीत महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक