शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

...तर येणाऱ्या निवडणुकीवर गावाचा बहिष्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:40 IST

येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

एकलहरे : येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे येथील १४० मेगावॉटचे दोन संच बंद केले त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा संच मंजूर केला. मात्र आजवर शासन व प्रशासनाच्या वतीने तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या बदली संचाला वाटाण्याच्या अक्षदा वाहिल्या. ६६० संचांसाठी लागणारी जमीन, पाणी, कोळसा वाहतूक यंत्रणा, मनुष्यबळ सर्वसोई उपलब्धता असूनही आजपर्यंत उभारणीचे काम सुरू झाले नाही.मिळालेल्या माहितीवरून औष्णिक वीज केंद्राच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून, येथे अनेक प्रजातींचे लागवड केलेली झाडे नाहीसे करून भौगोलिक वातावरण सौर ऊर्जा प्रकल्पाला अनुकूल नसतानाही सौर ऊर्जाचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.  एकलहरे औष्णिक प्रकल्पासाठी शासनाने जिल्हाधिकाºयांमार्फत शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या, परंतु १९६४ शेतकºयांचे पुनर्वसन केले नाही. नोकरी व सवलती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.शिवाय कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकरी, कष्टकरी, कामगार रास्ता रोको, उपोषण, घेराव अशा प्रकारची आंदोलने करतील, असा इशारा एकलहरे प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, विनायक हारक, अनिल जगताप, सुनील जाधव, पंढरीनाथ कांबळे, लकी ढोकणे, रामदास फणसे, अतुल धनवटे, शेखर अहेर, सागर जाधव आदींनी दिला आहे.एकलहरे वीज केंद्राच्या पंचक्रोशीतील ८ ते १० गावांना या वीज केंद्रामुळे रोजगार मिळत आहे. हे वीज केंद्रच बंद झाले तर त्यावर अवलंबून असलेल्या १५ ते २० हजार लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्यामुळे बेकारी निर्माण होऊन अनागोंदी माजेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे, जर ६६० मेगावॉटचा प्रकल्प सुरू केला नाही तर येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक