शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:15 IST

येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.

येवला : येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.  पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी, सेना, अपक्ष यांच्यासह घरचा आहेर देणाºया दोन भाजपा नगरसेवकांसह तब्बल २१ नगरसेवकांनी पालिकेद्वारा कोणतीच जनविकासाची कामे होत नसल्याचा थेट घणाघात करीत भाजपाचा नगराध्यक्ष असूनही गेल्या दीड वर्षात निधी अभावी कोणतेही काम होत नाही. यामुळे सभेचा अजेंडा वाचण्यापूर्वीच विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. पालिकेसमोर २१ नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले. पालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी कामाबाबत हतबलता दाखविल्याने २१ नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांना दिले.  सभेमध्ये जनतेची कामे होत नाहीत, त्यात सर्व नगरसेवकांनी मग ते सत्ताधारी असो वा विरोधक यांची कामे होत नाही यावर खडाजंगी झाली. राष्ट्रवादी गटनेता डॉ. संकेत शिंदे, अपक्ष गटनेता रूपेश लोणारी, सेनेचे गटनेते दयानंद जावळे यांनी सभागृहात जनहिताची कामे व्हावीत यासाठी आग्रह धरीत सभात्याग करून पालिकेबाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये भाजपाचे दोन नगरसेवक सामील झाल्याने शहरामध्ये चर्चा सुरू झाली आहे. संतप्त नगरसेवकांनी आमची कामे होत नाही, आपले नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात असूनही येवल्यासाठी का निधी उपलब्ध होत नाही, नगराध्यक्ष नेमके करता काय, असा सवाल केला. सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकीत राष्ट्रवादी, अपक्ष यांचे सर्व नगरसेवकांसह भाजपाचे गणेश शिंदे, पुष्पा गायकवाड तर शिवसेनेच्या सरोजिनी वखारे यांनी सभात्याग केला. सभात्यागानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे धरीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घोषणाबाजी व निषेध व्यक्त केला.धरणे आंदोलनात सहभागी नगरसेवक  या धरणे आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रवीण बनकर, निसार शेख, प्रा. शीतल शिंदे परविनबानो शेख, तेहसिन शेख, सबिया मोमीन, रईसाबानो शेख , नीता परदेशी, अपक्ष गटनेते नगरसेवक रूपेश लोणारी, सचिन मोरे, अमजद शेख, अपक्ष नगरसेवक पद्मा शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, शिनसेनेच्या नगरसेवक किरण जावळे, सरोजिनी वखारे यांनी सहभाग घेतला होता. तर जनतेच्या रोजच्याच प्रश्नाला उत्तरे देऊन कंटाळलेल्या भाजपाचे नगरसेवक गणेश शिंदे व पुष्पा गायकवाड यांनीही या धरणे आंदोलनात सहभागी होत भाजपाला घरचाच आहेर दिला.

टॅग्स :Nashikनाशिक