शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सभेवर बहिष्कार : अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप व्ही. एन. नाईक संस्थेची सभा वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:27 IST

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी होणारी सर्वसाधारण सभा वादात सापडली असून, सभेची माहिती दडवून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देव्ही. एन. नाईक संस्थेची सभा वादात सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी होणारी सर्वसाधारण सभा वादात सापडली असून, सभेची माहिती दडवून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.प्रल्हाद पाटील कराड, एन. एम. आव्हाड, तुकाराम दिघोळे, अ‍ॅड. का. का. घुगे या सभासदांनी या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्या संस्थेची वार्षिक सभा दि. २४ रोजी दुपारी २ वाजता असल्याचे समजले असून, सदर सभेची नोटीस जास्त खपाच्या वर्तमानपत्रात न देता दुसºया वर्तमानपत्रात देण्याबाबतचा संस्थेचा उद्देश समजला नाही. संस्थेचे कामकाजाबाबत सध्याचे संचालक मंडळ, पदाधिकारी यांनी कोणताही समन्वय किंवा सहविचार आजपावेतो पाळलेला नाही. तसेच संस्थेच्या कार्यक्रमात समाजातील लोकांना सहभागी करून घेतले जात नाही, संस्थेचे पदाधिकारी अहंकार व अहंगडांचे प्रदर्शन करून मर्यादा सोडून बोलतात याचे आम्हाला शल्य आहे. संस्थेच्या यशाचे सारे श्रेय स्वत:कडे खेचून घेण्याचा पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याबद्दल पत्रात दु:ख व्यक्तकरण्यात आले अ सून, अशा परिस्थितीत आम्ही वार्षिक सभेस उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे सभा तहकूब करावी किंवा नाही तर आमचा सर्वांचा वार्षिक सभेवर बहिष्कार आहे असे समजावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी विद्यमान संचालकमंडळावर दाखविलेल्या या अविश्वासामुळे रविवारी होणारी सभा गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विनियोग केला नसल्याचा आरोप संस्थेच्या वार्षिक अहवालात दिलेल्या जमाखर्चाचा ताळमेळ दिसत नाही, तसेच जागेच्या मिळालेल्या पैशांचा जमा खर्च व्यवस्थित नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असून, कबड्डी प्रीमिअर लिगच्या खर्चाबाबत मजकूर आहे, परंतु प्रायोजक व पैसे जमा झाल्याचा उल्लेख नाही. कार्यकारी मंडळाच्या काळामध्ये कोणतीही महत्त्वाची कामे नजरेत भरतील असे झालेले नाही, उलट संस्थेची सर्व्हे नंबर ७१७/१अ ही मिळकत विकून जे पैसे मिळाले त्याचा विनियोग सुद्धा व्यवस्थित केलेला नसल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.