शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:57 IST

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाचे पाऊल : नव्याने सीमांकनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने पाऊल उचलले असून, नव्याने सीमांकन करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. याबाबतचा आराखडा व प्रस्ताव राज्य वन्यजीव महामंडळाला सादर करण्यात आला आहे.जिल्ह्णातील निफाड तालुक्यामध्ये गोदावरी-कादवा नदीच्या संगमावार नांदूरमधमेश्वर बंधारा इंग्रजकाळात बांधला गेला. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला पाणथळ जागा विकसित झाली. पाणथळ जागेतील नैसर्गिक जैवविविधतेने हा परिसर समृद्ध झाला.नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सीमांकनाचा मुख्य मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अभयारण्याची सीमा निश्चित होईल, जेणेकरून संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण होणाºया अडचणींवर मात करणे वन्यजीव विभागाला शक्य होणार आहे. सीमांकन निश्चित झाल्यानंतर नैसर्गिक अधिवास विकसित करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.स्थानिक गावकºयांमधील संभ्रम दूर होऊन लोकसहभागातून अभयारण्याच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर करता येईल, असा विश्वासही उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी व्यक्त केला आहे.सीमांकनाचा तोटा स्थानिक नागरिकांसह अभयारण्याला संवर्धनाच्या बाबतीतही आहे. भविष्यात या अभयारण्याच्या संरक्षणासाठी सीमानिश्चिती करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने वन्यजीव विभागाने आराखडा तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितीत असलेल्या राज्य वन्यजीव मंडळाकडे सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.