शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बाटल्यांपासून साकारले विद्यार्थ्यांनी अनोखे आकाशकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 23:50 IST

वनसगांव : दिवाळीचे वेध लागताच आठवण येते ती आकाशकंदीलाची. परंतु बाजारातील विकत घेतलेल्या आकाशकंदीलांपेक्षा स्वत: तयार केलेल्या आकाशकंदीलाची मौज काही वेगळीच असते. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती येथे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देवनसगांव : रायतेवस्ती येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यशाळा

वनसगांव : दिवाळीचे वेध लागताच आठवण येते ती आकाशकंदीलाची. परंतु बाजारातील विकत घेतलेल्या आकाशकंदीलांपेक्षा स्वत: तयार केलेल्या आकाशकंदीलाची मौज काही वेगळीच असते. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती येथे आयोजन करण्यात आले होते.शिक्षक गोरख देवढे यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून घरच्या घरी आकर्षक आकाशकंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वह्यांचे पुठ्ठे, रिकामे खोके, जुने रंगीत कापड, वर्तमानपत्रातील रंगीत कागद, फुगे यांचा वापर करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करत कमी खर्चात व कमी वेळेत आकाशकंदील तयार करण्यात चिमुकले दंग झाले. त्यानंतरयंदाच्या दिवाळीत स्वत: तयार केलेला आकाशकंदील घरी लावण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देऊन स्वनिर्मितीचा आनंद देत टाकाऊतून टिकाऊ आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप व पालकांनी कौतुक केले. कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्र्मचारी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थी साजरी करणार प्रदुषणमुक्त दिवाळी..यावेळी शाळेतील शिक्षक शशिकांत पाटील यांनी फटाक्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पर्यावरण प्रदूषण याची विद्यार्थ्यांना माहिती देऊन यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. त्याला विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. 

टॅग्स :DiwaliदिवाळीSchoolशाळा