शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ठक्कर बाजारसमोर दोघांना बेदम मारहाण

By admin | Updated: June 6, 2015 00:28 IST

टोळक्याची दबंगगिरी : धाडसी महिलेने केली सुटका

नाशिक : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठक्कर बाजारसमोरील एका हॉटेलसमोर दुचाकीचा धक्का लागल्याची कुरापत काढून १५ ते २० जणांच्या टोळक्याने दोघा युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. टोळक्याने हल्ला केल्याने एका युवकाने भीतीपोटी पलायन केले, तर टोळीतील काहींनी दुसऱ्या एका युवकाचा पाठलाग करून त्याला पकडून आणले. त्याची बॅग हिसकावून घेत हॉटेलसमोरच बेदम मारहाण केली. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता त्या युवकाला पकडून थेट हॉटेल परिसरात असलेल्या एका खोलीत काही काळ डांबून ठेवले. किरकोळ कारणावरून युवकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत असल्याचा प्रकार हॉटेलसमोर उभे असलेले अनेकजण उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्यातील काही नागरिकांनी धाडस दाखवून धाव घेत वाद मिटविण्याचा प्रयत्नही केला; परंतु हिंदी भाषेत बोलणाऱ्या टोळीने त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने त्या टोळक्यापुढे सर्वांनाच नमते घ्यावे लागले. अखेर त्या हॉटेलबाहेरच उभ्या असलेल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने तसेच एका महिलेने धाडस दाखवून त्या खोलीकडे धाव घेत टोळक्याने डांबून ठेवलेल्या तरुणाची सुटका केली. सदर घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली; मात्र तोपावेतो टोळक्यातले तरुण व ज्या दोघा युवकांना मारहाण झाली ते निघून गेले होते. शहरातील मध्यवर्ती भागातील नावाजलेल्या हॉटेलसमोरून दोघे युवक दुचाकीवरून जात असताना एका दुसऱ्या दुचाकीला धडक लागली. या कारणावरून कुरापत काढून त्या दोघा युवकांना रस्त्यात अडवून टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त करून किरकोळ कारणावरून युवकांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)