शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार लोखंडे खून प्रकरणी दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:16 IST

फुलेनगर पाण्याच्या पाटालगत राहणाऱ्या प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना गुरुवारी ताब्यात घेतले आहे.

पंचवटी : फुलेनगर पाण्याच्या पाटालगत राहणाऱ्या प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना गुरुवारी ताब्यात घेतले आहे. लोखंडे याचा मंगळवारी रात्री पाटाजवळील वसाहतीत धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून करण्यात आला होता त्यानंतर संशयित मारेकरी पसार झालेले होते.याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तीन ते चार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुरुवारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना संशयित आरोपी पेठरोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, कैलास वाघ, हवालदार बाळा ठाकरे, सुरेश नरवडे, अरुण गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंके, संतोष काकड, बाळासाहेब मुर्तडक परिसरात पोलिस पथक पाठवून पोलिसांनी मखमलाबाद एरीकेशन कॉलनीतील रामशृष्टी सोसायटीत राहणाºया सोनू बाबुराव धात्रक तसेच जुईनगर पंचम सोसायटी येथे राहणाºया नितीन रमेश खलसे या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य संशयितांच्या मदतीने सराईत गुन्हेगार लोखंडे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकरणातील अजून काही संशयित आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सराईत गुन्हेगार लोखंडे यांचा खून पूर्ववैमनस्यातून की अन्य काही कारणावरून झाला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक