नाशिकरोड : देवळाली गाव रोकडोबा वाडी येथे अण्णा गणपती मंदिराजवळील नदिकिनारी रविवारी मध्यरात्री दोन युवकांची हत्या झाल्याचे उघड झाले. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोकडोबावाडी वालदेवी नदी किनारी नवीन पुलाजवळ रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आरडाओरड ऐकू आल्याने परिसरातील रहिवासी घटनास्थळी आले असता येथे गुलाब करिम शेख (३०) व अकबर अन्वर शेख रा. रोकडोबावाडी याचा खून झाल्याचे दिसून आले. तर संदिप रघुनाथ जैन गंभीर जखमी आहेत. जखमीस बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी मोटरसायकल एम.एच.-१५-जी-४८६१ पडून होती. परिसरात अंधार असल्याने ही घटना नेमकी कशी घडली याचा शोध घेण्यात अडथळे येत होते.
रोकडोबावाडीत दोघांची हत्त्या
By admin | Updated: August 8, 2016 01:34 IST