इन्फो
आतापर्यंत २४ लाख ४८ हजार चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५ हजार ३३४ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर २० लाख ४२ हजार ५०८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४ लाख ४८ हजार ८०९ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक भागांत चाचण्या थांबवल्या जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून अनेक लोक वैद्यकीय उपचार घेण्यास टाळाटाळ करत घरगुती उपचारांवर भर देत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
इन्फो सिन्नरने वाढवली चिंता
दुसरी लाट जिल्ह्यात आटोक्यात आलेली असताना सिन्नर तालुक्याने मात्र चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात सध्या ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील ४७९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सिन्नर तालुक्यात सर्वाधिक १६३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याखालोखाल निफाड तालुक्यात ९३ रुग्ण उपचार घेत आहेत. अन्य तालुक्यांत कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसून येत आहे. सिन्नरकडे प्रशासनाने अधिक लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.