शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोरवड घाटात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 21:21 IST

सिन्नर : सिन्नर -घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी मध्यरात्री कारचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर ...

ठळक मुद्देसिन्नर-घोटी महामार्ग: तीन जण गंभीर जखमीसिन्नर : वळणावर अज्ञात कारच्या हुलमुळे घडला अपघात

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी मध्यरात्री कारचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घोरवड घाटाच्या सुरुवातीस वळणावर आशीर्वाद लॉन्सजवळ सदर अपघात झाला.सिन्नर येथील त्र्यंबक नामदेव वाघ, देवीदास पोपट ढोके, सोनू परमार, व इतर दोघेजण (रा. सर्व सिन्नर) हे कारने कामानिमित्त कल्याण येथे गेले होते. काम आटोपून ते सिन्नरला येत होते. सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटाच्या सुरुवातीला असलेल्या आशीर्वाद लॉन्स समोरील वळणावर कार आली असता अचानक समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने कारला हुल दिला. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळेस उलटली व टेकाडावर जाऊन आदळली. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारमधील त्र्यंबक वाघ व देवीदास ढोके (३५) यांच्या डोक्याला व शरीराला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सोनू परमार यास गंभीर दुखापत झाली. तसेच यांच्यासोबत असलेल्या दोघांनाही मार लागलेला असल्याने स्थानिकांनी मदत करत रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले, तर इतर दोघांवर सिन्नर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनायक आहेर हे करत आहेत.सिन्नर-घोटी महामार्गावर अपघातात ठार झालेले देवीदास ढोके व त्र्यंबक वाघ.

टॅग्स :sinnar-acसिन्नरAccidentअपघात